धक्कादायक…टाटा हाॅस्पिटलमधील महिला डाॅक्टरने इंजेक्शनद्वारे केली आत्महत्या

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन

परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलध्ये एका महीला डाॅक्टरने इंजक्शनव्दारे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुपाली काळकुंद्रे वय ३१ अशी मृत महिला डाॅक्टरची आेळख आहे. नैराश्याने ग्रस्त असल्या कारणाने त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शनिवारी दुपारी रुपाली त्यांच्या खोलीत बेशुद्धाअवस्थेत सापडल्या अशी माहिती हाॅस्पिटलमधून देणयात आली. हाॅस्पिटलमधील डाॅक्टरांना तिथेच निवासाची व्यवस्था आहे. कोणत्या आैषधाचा शरिरावर काय परिणाम होऊ शकतो याची माहिती असल्याने रुपाली यांनी स्वत:च इंजक्शन टोचुन घेवुन आत्महत्या केली.गेल्या काहीवर्षीपासुन त्या नैराश्याने ग्रस्त असुन यासाठी त्यांच्यावर उपचार देखील चालु होते. त्यांचे पतीही डॉक्टर आहेत.परळचे टाटा रुग्णालय कॅन्सरवर उपचारासाठी प्रसिद्ध आहे. कॅन्सरच्या आधुनिक उपचारपद्धती या हॉस्पिटलमध्ये असल्याने देशभरातून मोठया संख्येने रुग्ण टाटा रुग्णालयात येतात. शनिवारी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास आम्हाला या आत्महत्येबद्दल कळले. पोलिसांनी सध्या तरी अपघाती मृत्यू अशी नोंद केली आहे. अशी भोईवाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी ही माहिती दिली.

Loading...
You might also like