भारतातील सर्वात स्वस्त कार; 1 KM साठी फक्त 40 पैसे खर्च, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिवसेंदिवस भारतात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. यामुळे अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक कारला लाँच करीत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असल्याने इलेक्ट्रिक कार एक चांगला पर्याय होत आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रचंड वाढ होत असल्याने इलेक्ट्रिक गाड्यांना अच्छे दिन आले आहेत. अनेक ऑटो कंपन्या आता इलेक्ट्रीक कार लाँच करीत आहेत. काही कंपन्यांच्या कार महाग असल्या तरी काही कंपन्या मात्र स्वस्त किंमतीत कार लाँच करीत आहेत.

भारतात अनेक कंपन्यांनी आतापर्यंत इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. परंतु, लाँच झालेल्या या कारमध्ये काही कारची किंमत खूपच जास्त आहे. अनेक कार कंपन्या आता स्वस्त आणि हाय रेंजच्या इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची प्लानिंग करीत आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशा काही कारसंबंधी माहिती देत आहोत. ज्यात तुम्हाला जबरदस्त रेंज मिळेल. याची किंमत सुद्धा कमी आहे.

या कारची बुकिंग सुरू झाली आहे. याला १० हजार रुपये देऊन बुक केले जाऊ शकते. या कारची डिलिवरी २०२२ पासून सुरू केली जाणार आहे. Strom R3 एक थ्री-व्हीलर इलेक्ट्रिक कार आहे. याची किंमत ४.५ लाख रुपये आहे. या इलेक्ट्रिक कारची लांबी २,९०७ mm, रुंदी १४०५ mm आणि उंची १५७२ mm आहे. याचे एकूण वजन ५५० किलोग्रॅम आहे. सिंगल चार्च मध्ये ही कार २०० किलोमीटर पर्यंत रेंज देते. या कारची बॅटरी तुम्हाला फक्त ३ तासांत फुल चार्ज करता येऊ शकते. कंपनी याच्या बॅटरी वर १ लाख किलोमीटर किंवा ३ वर्षापर्यंत वॉरंटी देते.

या कारच्या अन्य फीचर्स मध्ये यात सनरूफ, फ्रंट व्हीलसाठी डिस्क ब्रेक आणि ७ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिले आहे. या कारमध्ये २० जीबी पर्यंत गाण स्टोरे करता येऊ शकते. याचा खर्च पाहिले तर तुम्हाला एक किलोमीटरसाठी फक्त ४० पैसे खर्च येऊ शकतो. या कारची टॉप स्पीड ८० किलोमीटर प्रति तास इतका आहे.