Strong Bones Diet | हाडे ठेवायची असतील दिर्घकाळापर्यंत मजबूत, तर ‘या’ 5 गोष्टींचे रोज करा सेवन; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Strong Bones Diet | तुम्ही अनेकदा महिला आणि पुरुष (Men and Women) दोघांनाही पाठ, सांधे किंवा गुडघेदुखीच्या (Back, Joint or Knee Pain) तक्रारी करताना ऐकले असेल. शरीराच्या या ठिकाणी वेदना होतात कारण एकतर त्यांची हाडे (Bones) कमकुवत झालेली असतात किंवा पोषणाची कमतरता असते. हाड ही एक गतिमान जिवंत ऊती आहे, जी व्यायाम (Exercise) किंवा वापर केल्याने मजबूत होते आणि वापरली जात नाही तेव्हा ठिसूळ (Strong Bones Diet) बनते.

 

पुरुषांपेक्षा जास्त, 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया ज्या रजोनिवृत्तीच्या जवळ आहेत, अनेकदा अशा प्रकारच्या वेदनांची तक्रार करतात कारण त्यांच्या शरीरात इस्ट्रोजेन (Estrogen) उत्पादनात अचानक घट झाल्यामुळे हाडांची झीज होते.

 

हाडांच्या खराब आरोग्यामुळे मुडदूस (Muddus) आणि ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis) सारख्या स्थिती उद्भवू शकते आणि त्यामुळे पडल्यामुळे हाड तुटण्याचा धोका वाढतो. निरोगी आणि तंदुरुस्त हाडांसाठी चांगला आहार (Strong Bones Diet) फायदेशीर ठरतो.

 

हाडांना आवश्यक पोषण देण्यासाठी आणि मजबूत, निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणत्या 5 पदार्थांचा समावेश करावा ते जाणून घेवूयात (5 Foods Should Be Included In The Diet To Provide Essential Nutrients To The Bones And Keep Them Strong And Healthy)…

 

कॅल्शियम समृद्ध अन्न (Calcium Rich Food)
कॅल्शियमच्या (Calcium) डबल शॉटने दिवसाची सुरुवात करा. कॅल्शियम-फोर्टिफाइड धान्ये (Calcium-Fortified Grains) किंवा दूध (Milk) निवडा ज्यामध्ये फायबर (Fiber) (3 ग्रॅम) जास्त असेल आणि साखर कमी असेल.

फॅटी फिश (Fatty Fish)
फॅटी फिश हे व्हिटॅमिन डीचा (Vitamin D) उत्कृष्ट स्रोत आहे.
माशाचा फक्त 85 ग्रॅम भाग ‘व्हिटॅमिन डी’च्या दैनिक मूल्याच्या 100% पेक्षा जास्त प्रदान करते.

 

हिरव्या पालेभाज्या (Green Leafy Vegetables)
आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. यामध्ये पालक (Spinach), काळे (Kale), लेटस (Lettuce) या भाज्यांचा समावेश आहे.

 

दही (Curd)
दही हा असाच एक खाद्यपदार्थ आहे ज्यामध्ये प्रोटीनसह (Protein) चांगले बॅक्टेरिया देखील असतात जे आतड्यासंबंधी आरोग्यास प्रोत्साहन देतात.
227 ग्रॅम दह्यामध्ये 400 एमजी कॅल्शियम असते. जर तुम्हाला हेल्दी स्नॅक (Healthy Snack) म्हणून दही खायचे असेल,
तर फॅट नसलेले दही किंवा अतिरिक्त प्रोटीन असलेले ग्रीक योगर्ट खावे.

 

दुधाऐवजी करा या गोष्टीचे सेवन (Use These Things Instead Of Milk)
तुम्ही गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाऐवजी बदाम (Almond), सोया (Soya), काजू (Cashew) किंवा हेम्प दूध (Hemp Milk) घेऊ शकता.
या सर्व प्रकारच्या दुधात व्हिटॅमिन-डी आणि कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असते.
बदामाचे दूध कॅल्शियमच्या दैनिक मूल्याच्या 45% आणि व्हिटॅमिन डीच्या दैनिक मूल्याच्या 25% प्रदान करते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

#Lifestyle  #Health  #Health Tips  #Healthy Lifestyle  #Bone Health  #Bone Pain  #Joint Pain  #Joint Health Problems  #Join Pain Remedies  #Strong Bones Diet  #Lifestyle And Relationship  #Health And Medicine  #हेल्थ टिप्स  #हेल्दी लाइफस्टाइल  #सांधे दुखी  #हाडांमध्ये वेदना  #सांधेदुखीचे उपाय

 

Web Title :- Strong Bones Diet | include these 5 food items in your diet to keep bones strong for longer time

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | तरुणाला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न, सहकारनगर पोलिसांकडून आरोपीला अटक

 

High Blood Pressure Tips | खनिजांनी समृद्ध असलेले ‘हे’ 3 फूड्स करू शकतात हाय ब्लड प्रेशर कंट्रोल

 

TET Exam Scam | पुणे पोलिसांकडून टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी तब्बल 3995 पानांचे दोषारोप पत्र दाखल