दिल्ली पोलिसाकडून शांती पुर्ण आंदोलनाला गुन्हा ठरविण्याच्या कृतीचा पाथरीत निषेध

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीत घडलेल्या फेब्रुवारी महिन्यातील दंगल प्रकरणी पोलिसांनी पुरवणी आरोपपत्रात अनेक नेत्यांची नावे समाविष्ट केली आहेत.

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, स्वराज अभियान नेते योगेंद्र यादव, अर्थतज्ज्ञ जयंती घोष, दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक आणि मानवाधिकार कार्यकर्ते अपूर्वानंद आणि माहितीपट निर्माते राहुल रॉय यांच्या नावांचा आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे.

सोमवार ( चौदा/सप्टेंबर ) रोजी पाथरी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निवेदन देऊन निषेध नोंदविला. भाजप कडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. फेब्रुवारी महिन्यातील , दिल्लीतील घडलेल्या दंगल प्रकरणी संभ्रम निर्माण केला जात आहे. एनआरसी, सीएएला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी दंगलीचे कटकारस्थान केला. असल्याचं भारतीय जनता पक्षाकडून पद्धतशीर पणे पसरवले जात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

तहसीलदार सुभाष कट्टे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी देण्यात आलेल्या निवेदनावर काॅ. लिंबाजी कचरे पाटील काॅ. दिपक लिपणे, काॅ. भागवत कोल्हे, काॅ. बालासाहेब गिराम, काॅ. गोकूळ शिंदे, काॅ. भारत गायकवाड, काॅ. बळीराम वर्हाडे, काॅ. संजय देशमुख, आदींच्या स्वाक्षरी आहेत.