राज्यातील सत्तासंघर्ष म्हणजे ‘थरारक’ सिनेमाच, संजय राऊत स्वप्नात देखील ‘हे’ बडबडायचे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यातील सत्तासंघर्ष रोमांचक होता, थ्रीलर सिनेमासारखा होता. मी स्वप्नात पण बडबडायचो मुख्यमंत्री आमचाच होणार. महाराष्ट्राने सगळ्यांच्या मनात असलेली भिती संपवली असे मनोगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी खासदारांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी संजय राऊत बोलत होते.

गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘राज्यातील सत्तासंघर्ष रोमांचक होता, थ्रीलर सिनेमासारखा होता, आता काय होईल, दुपारी काय होईल, संध्याकाळी काय होईल हेच सुरु होतं. पवारांना भेटायला जायचो तेव्हा टोपी लागेल की टोपी लावतील अशी चर्चा लोकांमध्ये होती. या सर्वामध्ये 30-32 दिवस गेले, कोणाचा विश्वास नव्हता काय होईल, मी स्वप्नात पण बडबडायचो मुख्यमंत्री आमचाच होणार.

घरातले बोलायचे बाबा तुम्हाला वेड लागलंय का? शेवटपर्यंत ही गोष्ट आपण सगळ्यांनी पुढे नेली. हा सिनेमा रोमांचक, भयपट म्हणा, थरारक असा होता. महाराष्ट्राने देशाला दिशा दिली. आता देशातील इतर राज्यातले नेते ही म्हणत आहेत की ‘ये हमारे यहा भी हो सकता है’. हा 36 दिवसांचा जो राजकीय खेळ होता, तो कमिटमेंटचा खेळ होता. शरद पवारांवर माझा कमालीचा विश्वास होता. शरद पवारांनी एकदा गोष्ट मनावर घेतली तर ते ती पूर्ण करतात यावर आमचा विश्वास होता. ‘

शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी मोठी भूमिका बजावली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राऊत हे सातत्याने शिवसेनेची भूमिका मांडताना दिसले.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like