ST बसला दिवसाला 18000 खर्च, उत्पन्न मात्र 2000

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोनाचा हैदोस वाढत असल्यामुळे लॉकडाउन कायम ठेवणयात आले होते. मात्रा, रेडझोन नसलेल्या ठिकाणी एसटीच्या प्रवासी सेवेला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार उपराजधानी असलेल्या नागपूर गृामीणमध्ये शुक्रवारपासून प्रवासी बससेवा सुरू झाली. पहिल्या दिवशी धावलेल्या एकूण 78 बस फेर्‍यांमध्ये एसटीला केवळ 74 प्रवासी मिळाले. त्यातून दोन हजारांचे उत्पन्न मिळाले. तर एसटीला दिवसभरात इंधनाचा मिळून 18 हजारांचा खर्च आला.

कोरोनाचा रेडझोन असलेल्या नागपूर शहरात एसटीला प्रवेश नाही. परंतु ग्रामीण भागात सेवा सुरू झाली. पहिल्या दिवशी शुक्रवारी महामंडळाकडून 114 बसेसच्या मदतीने 3 हजार 950 किलोमीटर मार्गावर नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात बसमध्ये एक किंवा दोन प्रवासी होते. त्यामुळे निम्या फेर्‍या रद्द केल्या. दिवसभर्‍यातील 78 फेर्‍यांमध्ये प्रशासनाला केवळ 74 प्रवासी मिळाले. शुक्रवारी केवळ 1 हजार 300 किलोमिटर मार्गावरच एसटी धावली. यासाठी एसटीला 18 हजार 200 रुपये खर्च आला तर टिकिटांच्या उत्पनातून उत्पन्न केवळ 2 हजार रुपये मिळाले. त्यातच सेवा देणार्‍या प्रत्येक बसवर एक चालक आणि एक वाहक कार्यरत होता. त्यांच्यासह इतरांचे वेतन काढल्यास हा आर्थिक फटका खूप मोठा आहे. “पहिल्या दिवशी एसटीच्या प्रत्येक फेरीला एक किंवा दोन प्रवासी होते. दुसर्‍या दिवशी (शनिवारी) ही संख्या दोन ते तीन प्रवाशांवर गेल्याची प्राथमिक माहिती आहे. टाळेबंदीनंतर प्रथमच प्रवासी सेवा सुरू झाल्याने प्रतिसाद कमी असला तरी हळूहळू तो वाढण्याची आशा आहे. शनिवारी 114 बसेसचे 3 हजार 950 किलोमीटर प्रवासाबाबतचे नियोजन प्रशासनाने केली असल्याची माहिती विभाग नियंत्राक नीलेश बेलसरे यांनी दिली.