मुलींना पळविणा-या सख्ख्या भावांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन

दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करणा-या सख्ख्या भावांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी (दि.१०) कर्नाटकातील शिमोगा येथून अटक केली. त्यांच्या ताब्यातून मुलींची सुटका करुन त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.

ईलाही लालसाब नदाफ (वय २२) व हुसेल लालसाब नदाफ (१९, दोघे रा. गोकाक, कर्नाटक, सध्या कवलापूर, ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ईलाहीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १६ आॅगस्ट २०१७ रोजी, तर हुसेनने २७ डिसेंबर २०१७ रोजी तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मुलींचे अपहरण केले होते. याप्रकरणी मुलींच्या नातेवाईकांनी संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार नदाफ बंधूविरुद्ध मुलींचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. हे दोघेही मुलींना घेऊन कर्नाटकातील शिमोगा येथे राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक गुरुवारी शिमोगा येथे रवाना झाले होते. पथकाने नदाफ बंधूंना पकडून त्यांच्या ताब्यातून या मुलींची सुटका केली आहे. या दोघांना तासगाव व ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.