हैदराबाद रेपकेस : Facebook वर पिडीतेबाबत अपमानास्पद ‘कमेंट’, विद्यार्थ्याला पोलिसांनी घेतलं ‘ताब्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबादमध्ये महिला डॉक्टरबरोबर दुष्कर्म आणि हत्या प्रकरणातील पीडितेवर सोशल मिडियावर अपमानकारक भाष्य केल्याबद्दल एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी गुरुवारी सांगितले की आंध्रप्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातून एका 18 वर्षीय विद्यार्थ्याला सोशल मिडियावर अपमानकारक कमेंट केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.

रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश एम. भागवत यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना 29 नोव्हेंबरला सोशल मिडियावर कमेंट पोस्ट केली होती. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्याने आपले फेसबुक अकाऊंट डिलीट केले. ज्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी सांगितले की एक डिसेंबरला ही तक्रार दाखल करण्यात आली आणि तपासा दरम्यान या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले. तेलंगणा पोलिसांनी तेलंगणाच्या आणि आंध्रप्रदेशच्या विविध भागातून 3 जणांना पहिलेच विविध सोशल मिडियावर अपमानकारक पोस्ट केल्याबद्दल ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सक्तीने लोकांना या विषयी अपत्तीकारक कमेंट न करण्यास सांगितले आहे. तसेच अपमानकारक आणि बदनामी होईल अशी कमेंट न करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी सांगितले की जर कोणीही असे कृत्य करेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.