विद्यार्थीनीचा विनयभंग करत मारहाण, शिक्षकासह १० जणांवर गुन्हा

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग करुन तिला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बीड पोलिसांनी शिक्षकासह दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.१५) रात्री सव्वासातच्या सुमारास शहरातील सना टॉवर येथे घडला.

शिक्षक अशफाक आणि इतर दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी १९ वर्षीय पीडित मुलीने बीड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अशफाक आणि त्याच्या इतर दहा साथीदारांनी पीडित मुलीला कॉलेजमध्ये मुलासोबत का बोलतेस असा जबा विचारत तिला जबरदस्तीने रिक्षात बसवले. रिक्षामध्ये तिचा विनयभंग करुन बेदम मारहाण केली. अशफाक आणि त्याच्या साथीदारांनी पीडित मुलीला काठी, चपलीने बेदम मारहाण केली.

या घटनेत पीडित मुलगी गंभीरजखमी झाल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज तिने बीड पोलीस ठाण्यात येऊन शिक्षकासह दहा जणांविरुद्ध फिर्य़ाद दिली. पीडित मुलीच्या फिर्य़ादीवरुन पोलिसांनी अशफाक याच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ढगारे हे करीत आहेत.