कौतुकास्पद ! 9 वी च्या विद्यार्थ्यानं सायकलची बनविली बाईक, चक्क भंगाराच्या सामानाचा केला वापर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   9 वी मध्ये शिकणा्या विद्यार्थ्याला बाईक चालविण्याची फार इच्छा होत असे, मात्र वय लहान असल्याने वडिलांनी त्याला सायकल दिली नाही. लॉकडाऊन दरम्यान विद्यार्थ्याने जुगाड करून सायकलवरच इंजिन लावून दुचाकीमध्ये रूपांतर केले. ही घटना मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातील आहे. अक्षयला राजपूतला भंगाराच्या सामानातून उपयुक्त सामान बनविण्याची आवड होती. अक्षयने जुन्या चॅम्प गाडीचे इंजिन घेतले आणि जुगाड करत त्याला सायकलशी जोडले.

अक्षयच्या वडिलांचा टेंट हाऊसचा एक छोटासा व्यवसाय आहे. मुलाला मोटरसायकल चालविण्याची हौस होती, वडिलांनी वय लहान असल्याने नकार दिला. पण मुलाने जुन्या इंजिन सायकलमध्ये फिट करून आपले स्वप्न पूर्ण केले. अक्षय आता गावात फिरतो, गावातील लोक इंजिनवर चालणारी सायकल बघून अक्षयचे कौतुक करतात. अक्षयने याआधीही टायर बाईक बनविली होती, तेव्हा 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी व सभापती यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला.

अक्षय राजपूत यांनी सांगितले की, आम्हाला मार्केटमध्ये जावे लागते, यामुळे थोड्या वेळात आपण बाजारावर येऊ शकतो. हे कमी पेट्रोलवर चालते. मोपेड गाडी आहे, गीअरचे काम नाही. क्लच दाबल्यानंतर ती चालू होते. भंगारातील सामान घेऊन हे तयार केले जाते.