परीक्षेवरून परतणाऱ्या विद्यार्थ्याला टॅंकरने चिरडले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्याच्या दुचाकीला अज्ञात टेम्पोने धडक दिल्यानंतर तो टॅंकरखाली आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना अब्दीमंडीजवळ सोमवारी दुपारी घडली.

सुजीत विलास सातदिवे (२२, एसटी कॉलनी औरंगाबाद) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सध्या परीक्षा सुरु आहेत. सुजीत सातदिवे हा खुलताबाद येथील कोहीनूर कला महाविद्यालयात परीक्षा देऊन तो एसटी कॉलनीतील घरी परत जात होता. त्यावेळी अब्दीमंडीजवळ आल्यावर त्याच्या दुचाकीला लालमती येथे तयार होत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या चौकातील वळणावर एका अज्ञात टेम्पोने मागून जोराची धडक दिली. त्यात तो रस्त्यावर पडला. परंतु त्याचवेळी खुलताबादकडे जाणाऱ्या टॅंकरने त्याला चिरडले. त्यात तो गंभीर जखमी झाला. दौलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला घाटी रुग्णालयात नेले. परंतु त्याला उपचारापुर्वीच मृत घोषित करण्यात आले.

Loading...
You might also like