तासगाव तालुक्यात डेंग्यूमुळे विद्यार्थीनीचा मृत्यू

तासगाव : पाेलीसनामा ऑनलाईन

तालुक्यात स्वाईन फ्ल्युने दोघांचा मृत्यू झाला असताना आता डेंग्यूने आणखी एक बळी घेतला आहे. कवठेएकंद येथील नववीच्या वर्गात शिकत असलेल्या सानिका राजेंद्र परीट (वय 15) या विद्यार्थीनींचा रविवारी (दि.१६) तासगाव येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
[amazon_link asins=’B0784D7NFX,B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f9c77408-ba9d-11e8-bb59-5180f6ab6a50′]

दरम्यान, कवठेएकंद येथील डेंग्यूच्या साथीला ग्रामपंचायत जबाबदार असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. तर मृत्यू झालेली विद्यार्थीनी तासगाव येथील विद्यालयात शिकत असल्याने यासाठी ग्रामपंचायतीला जबाबदार धरु नका असे अजब उत्तर सरपंच राजश्री पावसे यांनी दिले आहे.

डेंग्यूने मृत्यू झालेली सानिका परीट ही विद्यार्थीनी तासगाव येथील चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर मध्ये नववीच्या वर्गात शिकत होती. शुक्रवारी (दि 14) रोजी तिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रविवारी तिचा मृत्यू झाला.
[amazon_link asins=’B078BNQ313,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ffba9612-ba9d-11e8-ac9d-7181ddb849f5′]

आरोग्य विभागाने एक अहवाल कवठेएकंद ग्रामपंचायतीला दिला आहे. गावात डेंग्यूची साथ येण्यासाठी ग्रामपंचायतीला जबाबदार धरले आहे. डेंग्यूच्या साथीचा फैवाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने गावातील तुंबलेल्या गटारी वाहत्या कराव्यात, साचलेल्या पाण्याची डबकी मुजवून टाकावीत, गावातील निकामी टायर्सची विल्हेवाट लावावी, खर्चाचे पाणीसाठी झाकून ठेवण्याच्या सूचना ग्रामस्थांना द्याव्यात अशा सल्ल्यांचे डोस पाजले आहेत.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

You might also like