निवासी शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू, जिल्ह्यात प्रचंड खळबळ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – निवासी शाळेत राहणाऱ्या दुसरीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना पिंपळनेर येथे घटली आहे. एकलव्य रेसीडेन्सी इग्रंजी माध्यमिक विद्यालय असे निवासी शाळेचे नाव असून राजदिप मांगीलाल देसाई असे मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुख्याध्यापक, व्यवस्थापकांच्या निष्काळजीपणामुळे राजदिपचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

या घटनेनंतर साक्री तालूक्यातील सर्व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी ग्रामीण रुग्णालयात एकत्र आले. संबंधीत कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होत नाही, विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत राजदिपचे प्रेत उचणार नाही. संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. अशी मागणी आदिवासी संघटनेच्या वतिने करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही झाल्यास आदिवासी विकास मंत्रालय, मुंबई यांच्याशी संपर्क करणार असल्याचे संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like