वसतिगृहातील ‘त्या’ विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळ्यातील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्याचा इमारतिवरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रजेश गुलाबसिंग पवार (21) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. प्रजेश च्या मृत्यूमुळे वरसतीगृह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती, प्रजेश पवार हा फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. तो वसतिगृहामध्ये राहायला होता. वसतीगृहाच्या बाजूला नाल्याजवळ त्याच्या मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीसांनी मृताची तपासणी करुन मृतदेह शवविच्छेदन कक्षात तपासणीसाठी पाठविला. तो तोंडावर पडल्याने त्याच्या नाकातून कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. मात्र, नंदूरबारहून आलेल्या प्रजेशच्या नातेवाईकांनी मृतदेह पाहिल्यावर हा अपघाती मृत्यू नसून त्याला मारहाण करून खाली फेकले असल्याचा आरोप केला आहे. घटनेची सखोल चौकशी करुन गुन्हेगाराला अटक करावी. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी घेतला आहे. याप्रकरणी अधिक तपास धुळे पोलीस करत आहेत.

दरम्यान, प्रजेश ची नेमकी हत्या की आत्महत्या याबाबत परिसरात तर्क वितर्क सुरु आहेत.