पोहण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय शाळकरी मुलाचा बूडून मृत्यू

वसमत : पोलीसनामा ऑनलाईन – गावाशेजारी असलेल्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना वसमत तालुक्यातील महागाव येथे गुरुवारी घडली.

कृष्णा संतोष जाधव (१०) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

कृष्णा हा महागाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता ४ थी मध्ये शिक्षण घेतो. तो गुरुवारी शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत गावाशेजारी असलेल्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी शेतकऱ्यांच्या मदतीने त्याला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्याला वसमत येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच त्याला मृत घोषीत करण्यात आले.

Loading...
You might also like