दुर्देवी ! भगतसिंग यांच्या फाशीची रिहर्सल करताना विद्यार्थ्याचा मृत्यू

मंदसौर (मध्य प्रदेश) : वृत्त संस्था – तो साकारत होता शहीद भगतसिंगांची भूमिका नाटकाचा सराव करताना फाशीचा सीन करताना खरोखरच फाशी लागल्यामुळे प्रियांशु मालवीय या कलाकार मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे , त्याच्या शाळेत वार्षिक कार्यक्रमात शहीद-ए-आजम आणि सुखदेव यांच्या जीवनावरील हे नाटक आधारित होते. हि दुर्दैवी घटना मध्य प्रदेशातील मंदसौर येथील आहे.

प्रियांशु खरतर या नाटकात इंग्रजी शिपायांची भूमिका साकारत होता. शाळेतून कार्यक्रम संपवून तो घरी आला व दुसऱ्या दिवशी शेतामध्ये तो नाटकाचा सराव करत होता. तिथे तो भगतसिंगांचा रोल करत असताना त्याला फाशी देण्याचा प्रसंग साकारायचा होता. त्याने त्यासाठी बांबूच्या सालींचा फास तयार केला, मात्र फाशी घेत असताना त्याच्या गळ्याभोवती फास आवळला गेला आणि त्याचा श्वास कोंडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

जेव्हा आई -वडील शेतात येऊन बघतात तेव्हा मुलगा हालचाल करीत नसल्याचे त्याच्या लक्षात आले, त्यांनी पोलिसांना ही घटना कळवली. पोलिसांना घटनास्थळावरून एक मोबाईल सापडला . या मोबाइलमध्ये शाळेतील नाटकाचा व्हिडिओ असल्याचे पोलिसांनी पाहित्याचा. या व्हिडियोवरूनच त्याचा मृत्यू सराव करताना झाला असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला असून त्याआधारे पुढील तपास पोलीस करत आहेत.