‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री आहे बटर चिकन, मटन बिर्याणी आणि चीज ‘नान’ची शौकीन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – करण जोहरचा सिनेमा स्टुडेंट ऑफ द ईयर 2 चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या सिनेमातून चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे ही बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. अनन्या ही एक फिटनेस फ्रिक आहे हे सर्वांनाच माहित आहे. परंतु ही गोष्ट अनेकांना माहिती नाही की ती एक मोठी फूड लव्हर आहे. नकुताच एका मुलाखतीत बोलताना अनन्या पांडेने याबाबत खुलासा केला आहे.

मुलाखतीत बोलताना अनन्या म्हणाली की, “मला बटर चिकन आणि चीज नान खूप आवडतं. एवढंच नाही तर मी या दोन्हींचाही टॅटू बनवण्याचा प्लॅन करत आहे. मी या टॅटूला एखाद्या वेगळ्या भाषेत बनवण्याचा विचार करत आहे, जेणेकरून लोकांना याचा नेमका अर्थ कळणार नाही. मला जर कोणी अर्थ विचारला तर मी त्याचा वेगळा अर्थही सांगू शकेल.

अनन्या मेक्सिकन फूड लव्हर आहे. तिला बटर चिकन आणि चीज नानच्या व्यतिरीक्त कुकीज आणि गोट चीज, स्पाईसी चिकन पिज्जा, मटन बिर्याणी खूपच आवडते.

View this post on Instagram

isn’t it ramen-tic 🍜💛

A post shared by Ananya 👩🏻‍🎓💫 (@ananyapanday) on

अनन्या पांडेला स्टुडेंट ऑफ द ईयर 2 या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहून पिता चंकी पांडे खूप इमोशनल झाले होते. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “मला नाही वाटत की, अनन्याला यापेक्षा अजून चांगला डेब्यू मिळू शकत होता. जेव्हा तिने या सिनेमासाठी ऑडिशन दिले आणि त्यानंतर तिची या सिनेमासाठी निवड झाली त्यानंतर तिला झालेला आनंद हा बघण्यासारखा होता.”

स्टुडंट ऑफ द इयर 2 हा सिनेमा धर्मा प्रॉडक्शनचा असून प्रेक्षकांना या सिनेमाबद्दल विशेष उत्सुकता असल्याचे दिसत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाचा ट्रेलर चांगलाच व्हायरल होताना दिसला होता. दरम्यान अनन्या पांडे सोबतच तारा सुतारिया देखील या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

स्टुडंट ऑफ द इयर हा सिनेमा 2012 ला प्रदर्शित झाला होता. या सिनेमातून वरुण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हा सिनेमाही चांगलाच गाजताना दिसला होता. स्टुडंट ऑफ द इयर 2 या सिनेमाचे दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा यांनी केलं आहे. 10 मे रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like