home page top 1

#Video : ‘सुटंड ऑफ द इयर 2’ सिनेमातील ‘ये जवानी है दिवानी’ हे पहिलेवहिले गाणे व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुटंड ऑफ द इयर 2 या सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आला होता. यानंतर आता या सिनेातील पहिले गाणे रिलीज झाले आहे. हे गाणं किशोर कुमार यांचे ये जवानी है दीवानी याच गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन आहे. या गाण्यात टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे हे तिघेही थिरकताना दिसत आहेत. टायगरचा डान्स यात विशेष भाव खाताना दिसतो. तारा आणि अनन्यानेही आपल्या अदांनी लक्ष वेधून घेतले आहे. तिघांची छान केमिस्ट्री यात दिसत आहे. ये जवानी है दीवानी हे गाणं 1972 साली चित्रित झालं होतं. अभिनेता रणवीर कपूर आणि जया बच्चन हे दोघे या गाण्यात झळकले होते. आता या नव्या व्हर्जनमध्ये टायगर, तारा आणि अनन्या दिसत आहेत.

करण जोहर याने गाणे प्रदर्शित होण्यापूर्वी या गाण्याची एक क्लिप शेअर केली आहे. यात गिली स गिली अक्खा म्हणजेच ये जवानी है दीवानी या गाण्याची झलक पाहायला मिळाल्याचे दिसत आहे.

स्टुडंट ऑफ द इयर 2 हा सिनेमा धर्मा प्रॉडक्शनचा असून प्रेक्षकांना या सिनेमाबद्दल विशेष उत्सुकता असल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यात या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाचा ट्रेलर चांगलाच व्हायरल होताना दिसला होता. दरम्यान तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या दोघी अभिनेत्री या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

स्टुडंट ऑफ द इयर हा सिनेमा 2012 ला प्रदर्शित झाला होता. या सिनेमातून वरुण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हा सिनेमाही चांगलाच गाजताना दिसला होता. स्टुडंट ऑफ द इयर 2 या सिनेमाचे दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा यांनी केलं आहे. 10 मे रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Loading...
You might also like