पाषाण तलावाजवळ विद्यार्थ्याला लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हॉटेलमध्ये जेवण करून मित्रासोबत घरी निघालेल्या विद्यार्थ्याला पाषाण तलावाजवळ आडवून लुटल्याचा धक्कादायक घटना प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे.

याप्रकरणी ओंकार व्हरकट (वय २६, रा. मानाजीनगर, नऱ्हे) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेतो. तो नऱ्हे परिसरात मित्रासोबत राहतो. शनिवारी रात्री मित्रासोबत जेवण्यासाठी गेला होता. जेवण केल्यानंतर तो बंगळुरू-मुंबई महामार्गावरून दुचाकीवरून त्याच्या खोलीकडे निघाला होता. पाषाण तलावाजवळ आल्यानंतर तो लघुशंकेसाठी थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरून दोघे आले. तसेच पाठीमागून पकडून जवळ काय आहे ते काढून देण्याची धमकी दिली. तसेच, गळ्यातील ४५ हजार रूपये किंमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले. अधीक तपास पोलीस करत आहेत.

Visit : Policenama.com