Student Scholarships Issue Sloved | राज्यातील 3 लाख 22 हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार 364 कोटी

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Student Scholarships Issue Sloved | आर्थिक वर्ष संपायला एक आठवडा राहिला असताना राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. वित्त विभागाने (Department of Finance) शिष्यवृत्ती संदर्भातील नोडल एजन्सीबाबत काही त्रुटी व आक्षेप नोंदवले होते. मात्र सरकारने हे आक्षेप दूर केले आहेत त्यामुळे राज्यातील 3 लाख 22 हजार विद्यार्थांना 2020 – 21, 2021 – 22 या दोन वर्षांतील शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या खात्यावर लवकरच 364 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहे. (Student Scholarships Issue Sloved)
केंद्र सरकारच्या (Central Government) वित्त विभागाने केंद्र शासनाकडून राज्यांना शिष्यवृत्तीचा निधी दिला जातो तो वितरित करण्यासाठी स्टेट नोडल एजन्सी नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील (SC) विद्यार्थ्यांना देण्यात येणारी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत (Government of India Post Matriculation Scholarship Scheme) 60 टक्के निधी डीबीटीच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र, 40 टक्के निधी अभावी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला अडथळे निर्माण झाले होते. महत्त्वाचे म्हणजे आर्थिक वर्ष संपायला एक आठवडा बाकी आहे. (Student Scholarships Issue Sloved)
वित्त विभागाने राज्याच्या वाट्याच्या मंजुरी आणि सुधारित वितरणाबाबत आक्षेप नोंदविल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
समाज कल्याण आयुक्तांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (Department of Social Justice and Special Assistance) तसेच वित्त विभागाकडे (Department of Finance) सतत पाठपुरावा केला.
केंद्रीय सहसचिव व संबंधित यंत्रणांनी जे काही त्रुटी आढळल्या होत्या त्या दूर करून शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा केला.
—
या संदर्भात बोलताना समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे (Dr. Prashant Naranware) म्हणाले की,
”समाज कल्याण विभागाने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील सन 2020 – 21 व 2021 – 22 मधील सुमारे 3 लाख 22 हजार विद्यार्थ्यांच्या 364 कोटींचा प्रश्न मार्गी लागला.
शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर झाली असून, लवकरच ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Web Title :- Student Scholarships Issue Sloved | scholarships issue finally sloved rs 364 crore in 3 22 lakh students bank accounts
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update