शाळेची फी भरण्यासाठी विद्यार्थ्याने केली चोरी

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना काळात वडिलांच्या पगारात कपात झाली. त्यामुळे उत्तराखंडच्या रुद्रपूरमध्ये एका विद्यार्थ्याने शाळेची फी भरण्यासाठी चोरी केली. वडिलांच्या पगारात कपात झाल्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती ढासळली.

शहरातील बलवंत कॉलनीतील सचिन शर्मा हे रहिवासी आहेत. ते बँकेत ५. ३५ लाख रुपये भरण्यासाठी गेले. तिथे त्यांना चार जणांनी लुटले. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्यातील एका मुलाने सांगितलं, की शाळेची फी भरण्यासाठी आपण चोरी केली. त्याने सांगितलं कि वडील रुद्रपूरमध्ये एका कारखान्यात काम करतात. कोरोना काळात वडिलांच्या पगारात कपात झाली. त्यामुळे पगार कमी येत आहे. त्यामुळे फी भरण्यासाठी आपण हा मार्ग निवडला असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं.

दरम्यान, इंदूरमध्ये ही चोरीची एक घटना उघड झाली. बारावी शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने शाळेची फी भरण्यासाठी एका व्यक्तीचा मोबाइल चोरला. खाजगी गुप्तहेर धीरज यांचा हा मोबाईल होता. मोबाईल कुणाकडे आहे हे लगेच ट्रॅक झाले. दुबे यांनी अगोदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, या मुलीने फी भरण्यासाठी चोरी केल्याचं समोर आलं. दुबे यांनी तिला माफ केलं. त्या मुलीला आर्थिक मदतही केली.