धक्कादायक…युपीएससी परीक्षेला बसू न दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी परिक्षा नुकतीच रविवारी पार पाडण्यात आली आहे. यावेळी परिक्षेला बसु न दिल्यामुळे दिल्लीतील एका परिक्षार्थ्याने गळफास लावुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.वरुण वय २८ असे आत्महत्या करणाऱ्या परीक्षार्थीचे नाव असुन, वरुणच्या घरात एक चिठ्ठी मिळाली त्यामध्ये “नियम असण्यात काही चूक नाही, परंतु सहानुभूतीनं काही विचार तर करायला हवा.”असं नमुद केलं आहे.वरुण नवी दिल्ली मध्ये राजेंद्र नगर येथे भाड्याचे घर घेऊन राहत होता.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, युपीएससीची प्राथमिक फेरी ३ जून,रविवारी पार पडली. यावेळी काही कारणांमुळे वरुणला परीक्षेला बसण्यास मनाई केली होती.याकारणावरुन वरुणने आत्महत्या केल्याची माहिती मिळते. वरूण राजेंद्र नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता व युपीएससी या परीक्षेची तयारी करत होता. रविवारी तो परीक्षा देण्यासाठी पहाडगंज इथल्या केंद्रावर गेला. परंतु त्याला परिक्षा केंद्रावर जाण्यास उशीर झाल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे वरुणने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. युपीएससीच्या नियमांप्रमाणे परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनिटं विद्यार्थ्यांनी परीक्षाकेंद्रावर येणं अपेक्षित आहे. वेळेत न आलेल्या परिक्षार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही असं हा नियम आहे.