‘त्या’ विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा ! ऑल इंडिया बारच्या परिक्षेला बसू शकणार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मुंबई विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या याचिका प्रकरणावर उच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया बारच्या परीक्षेला बसण्याची व्यवस्था करण्याचे आदेश बार कौन्सिलला दिले आहेत. या विद्यार्थ्यांची उत्तीर्ण प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका देखील त्वरित देण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी 5 विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन देखील महाविद्यालयाच्या चुकीमुळे या विद्यार्थ्यांना सनद मिळण्यास अडचण येत होती. त्यानंतर ओंकार गावडे, श्वेता देसाई,सिद्धार्थ इंगळे,अमित मिश्रा आणि प्राजक्ता शेट्ये या पाच विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठ आणि सेंट विलफ्रेड कॉलेज ऑफ लॉ यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले कि, विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे महाविद्यालयात सादर केली होती. मात्र तरीदेखील कॉलेजने 70 विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता पूर्ण केली नव्हती. त्यामुळे न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल देत मुंबई विद्यापीठाला दणका दिला आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी हि 19 सप्टेंबर रोजी होणार असून या निकालामुळे या विद्यार्थ्यांचा परीक्षेला बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, सिद्धार्थ इंगळे या याचिकाकर्त्या विद्यार्थ्याने याविषयी बोलताना सांगितले कि, सर्व प्रकारची प्रक्रिया पूर्ण करण्यास मुंबई विद्यापीठ आणि कॉलेज अपुरे पडले आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही विद्यार्थ्यांबरोबर अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून विद्यापीठ आणि कॉलेजवर न्यायालय काय कारवाई करणार याकडे आमचे लक्ष आहे.

आरोग्यविषयक वृत्त –