Sushma Swaraj : असा कोणता भागच नाही : सुषमा स्वराज यांनी ‘त्या’ विद्यार्थ्याला फटकारले

भारताच्या परराष्ट्र मंत्री सोशल नेटवर्किंगवर प्रचंड ऍक्टिव्ह असतात हे सर्वांनाच माहीत आहे. परदेशातील प्रत्येक प्रामाणिक भारतीय नागरिकाला त्या मदत करायला तत्पर असतात. अशी त्यांची ओळख आहे. आजही एका ट्विटमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. ट्विटरवर मदत मागणाऱ्या एका विद्यार्थ्याला दिलेल्या उत्तरामुळे नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

ट्विटरवर शेख अतीक नावाच्या एका विद्यार्थ्याने सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली,”सुषमा जी मला तुमच्या मदतीची गरज आहे…मला भारतात माझ्या घरी परत येयचे आहे, पण माझा पासपोर्ट खराब झाला आहे, मी विद्यार्थी असल्याने जास्त खर्च करु शकत नाही तसेच माझी प्रकृतीही बरी नाहीये. तुम्ही काही करु शकतात का ?’असे विचारले. त्याच्या ट्विटला उत्तर देताना देखील सुषमा स्वराज यांनी ट्विट केले की,”जर तुम्ही जम्मू-काश्मीरचे असाल तर मी नक्कीच तुमची मदत केली असती. मात्र तुमच्या प्रोफाईलनुसार तुम्ही भारतव्याप्त काश्मीरमध्ये राहतात, आणि अशी कोणती जागाच नाहीये’.

सुषमा स्वराज यांच्या उत्तरानंतर मात्र त्या विद्यार्थ्याने लगेचच स्वतःची प्रोफाईल बदलली आणि भारतव्याप्त काश्मिरऐवजी जम्मू-काश्मिर असे केले. त्यानंतर त्याने पुन्हा ट्विट करुन, मी जम्मू-काश्मिरचा असून फिलिपाइन्समध्ये शिक्षणासाठी आलो आहे असे म्हटले.