‘या’ कारणामुळं खा. सुजय विखेंना करावा लागला रोषाचा ‘सामना’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शाळेचे क्रीडांगण वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी शहरातील सेंट विवेकानंद शाळेसमोर आंदोलन केलं. क्रीडांगणासाठी जागा सोडून दवाखाना बांधावा, या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी आज क्रीडांगण बचाओ आंदोलन केले. खासदार सुजय विखे येथे भूमिपूजनासाठी आले होते. मात्र आक्रमक विद्यार्थी व पालक पाहून त्यांना शांत बसावे लागले.

अहमदनगर शहरातील तारकपूर भागात असलेल्या सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलच्यासमोरील भागात सरकारच्यावतीने आयुष हॉस्पिटल बांधण्याचा प्रस्ताव आला आहे. याचे भूमिपूजन आज खासदार सुजय विखे यांच्या हस्ते होणार होते. मात्र सकाळपासूनच या शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी याठिकाणी भूमिपूजन होणार होते, त्या ग्राउंडवर ठिय्या आंदोलन केले.

क्रीडांगण बचाव आंदोलन सुरू केले होते. आम्हाला दवाखान्याला विरोध नसून फक्त काही जागा क्रीडांगणासाठी सोडावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली होती. अखेर सुजय विखे हे भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी सर्व जागेची पाहणी करून अखेर शाळेच्या क्रीडांगणासाठी जागा सोडावी, असा प्रस्ताव सरकारकडे पाठवावा असे अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like