इस्लामिक स्कूलमध्ये 100 विद्यार्थ्यांच्या पायात ‘साखळदंड’, कर्मचार्‍यांकडून लैंगिक अत्याचार

कदुना (नायजेरिया) : वृत्तसंस्था – नायजेरियातील कदुनामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका इस्लामिक स्कूलमधून बंदी बनवलेल्या 500 लोकांची पोलिसांनी सुटका केली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. बंदी बनवलेल्या लोकांमध्ये 100 विद्यार्थी साखळ्यांनी बांधून ठेवलेले आढळले. तसेच त्यांच्यावर कर्मचार्‍यांनी अत्याचार केल्याची माहिती उघडकीस आली आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
इस्लामिक स्कूल में जंजीर से बंधे मिले 100 छात्र, स्टाफ करता था रेप
कदुना पोलिस प्रवक्त्या याकुबु साबो यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही इस्लामिक शाळा जवळजवळ एक दशकापासून कार्यरत आहे. लोकांना येथे कुराण शिकवण्यासाठी ठेवण्यात आले होते. पालकांना वाटले की ते मुलांना कुराण सुधारण्यासाठी आणि शिकवण्यासाठी येथे पाठवत आहेत. बर्‍याच लोकांना ड्रग्स आणि रोगांपासून मुक्त करण्याचे आश्वासन देखील देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात या बंदी बनलेल्या लोकांचे लैंगिक शोषण केले होते. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये साखळ्यांनी बांधलेल्या 5 वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे.
इस्लामिक स्कूल में जंजीर से बंधे मिले 100 छात्र, स्टाफ करता था रेप
इस्लामिक स्कूल में जंजीर से बंधे मिले 100 छात्र, स्टाफ करता था रेप
कदुनाचे पोलिस प्रमुख अली जंग यांनी सांगितले आहे की, एका अज्ञात व्यक्तीने इमारतीत संशयास्पद गोष्टी घडत असल्याची माहिती दिली होती. यानंतर येथे छापा टाकण्यात आला. पोलिस प्रमुखांनी या घटनेला ‘हाऊस ऑफ टॉर्चर’ म्हटले आहे.
इस्लामिक स्कूल में जंजीर से बंधे मिले 100 छात्र, स्टाफ करता था रेप
याप्रकरणी पोलिसांनी शिक्षकांसह आठ संशयितांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की सुटका करण्यात आलेल्या लोकांमध्ये बरेच लोक जखमी तर अनेक जण भुकेले होते. काही लोकांना बर्‍याच वर्षांपासून येथे ठेवले गेले होते आणि त्यांना बाहेर जाण्याचेही स्वातंत्र्य नव्हते.
इस्लामिक स्कूल में जंजीर से बंधे मिले 100 छात्र, स्टाफ करता था रेप
एका युवकाने स्थानिक माध्यमांना सांगितले की 3 महिन्यांपासून या विद्यार्थ्यांचे पाय बांधून ठेवले होते. एकाने येथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला सिलिंग फॅनला लटकवण्यात आले होते.
इस्लामिक स्कूल में जंजीर से बंधे मिले 100 छात्र, स्टाफ करता था रेप

Visit : Policenama.com