विद्यार्थ्यांनी केली ‘सॅटेलाईट’ची निर्मिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सॅटेलाईटची प्रतिकृती निर्माण केली, ड्रोनच्या सहाय्याने त्याचे यशस्वी प्रक्षेपण केले आणि आकाशात विविध ठिकाणच्या उंचीवरील पर्यावरणीय नोंदी घेतल्या.

पुणेकर एज्युकेशन आणि सुरेश नाईक कबसेट मिशनच्या सहकार्याने या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सॅटेलाईटची निर्मिती प्रक्रिया, त्याची जोडणी, गाउंड स्टेशन, डेेटा सेंटर, निरीक्षणे नोंदविणे याची माहिती दोन दिवसांच्या कार्यशाळेत देण्यात आली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca74fb7d-cc89-11e8-943a-711027e1f73c’]

इस्रोचे माजी संचालक सुरेश नाईक यांनी मार्गदर्शन केले. नाईक यांनी चंद्र व मंगळावरील मोहिमेची माहिती दिली. सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, संचालक डॉ. सुनील भंडगे, डॉ. सविता केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन करण्याची आवड आणि नवनिर्मितीचा आनंद मिळावा या उद्देशाने उपक‘माचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती मुख्याध्यापिका लीना तलाठी यांनी दिली.

[amazon_link asins=’B01G5I8YLC,B073JYDK7P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d53200e7-cc89-11e8-ad02-cd64d56198a4′]

एकूण सहा सॅटेलाईट बनविण्यात आली. आकाशात ती ३० मीटर उंचीपर्यंत उडविण्यात आली. विविध उंचीवर तापमान, प्रकाशाची तीव्रता, हवेतील आर्द्रता यांच्यात होणार्‍या बदलांची निरीक्षणे संगणकावर नोंदविण्यात आली. गोळवलकर विद्यालयातील २५ आणि आरएमडी इंटरनॅशनल स्कूलमधील पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.