मोदींच्या रॅलीजवळ ‘मोदी पकोडे’ विकले, इंजिनिअरींग आणि लॉ च्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

चंदीगड : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीशेजारी काही इंजिनिअरींग आणि लॉ च्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पध्दतीने आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी मोदींच्या सभेजवळ चक्क मोदी पकोडे विकले. मात्र त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतले.

मागील वर्षी जानेवारीमध्ये एका वृत्तवाहिनीला मुखात देताना मोदी म्हणाले होते की, पकोडे विकणे हा सुद्धा एक रोजगार आहे. यातून दिवसाला २०० रुपये कमविले जाऊ शकतात. तो बेरोजगार नाही. या विधानाचा निषेध करण्यासाठी तरुणांनी हे आंदोलन केले. मात्र १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मोदींची सभा संपल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

पकोडा योजनेअंतर्गत आम्हाला नवीन रोजगार देणाऱ्या पंतप्रधानांच स्वागत करण्यासाठी आपण आलो आहोत. असं या विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. आम्ही जनसभेत पकोडे विकू इच्छितो. सिक्षित तरुणांना पकोडा विकताना आम्हाला किती छान वाटतं. हे पंतप्रधानांना समजावं यासाठी आम्ही इथे आलो असे विद्यार्थी म्हणाले. यात इंजिनिअरींग आणि लॉ च्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांच्या या अनोख्या आंदोलनाचा व्हिडीओदेखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.