विद्यार्थ्यांनी बनविला महापौरांच्या प्रभागाचा विकास आराखडा

अहमदनगर :  पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी विद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी, नगररचना व अन्य अनुषंगिक अभियांत्रिकी विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रभाग ६ मध्ये विकासाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार केला आहे.

सदर अहवाल आज महापौर व आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यावेळी यावेळी उपमहापौर मालन ढोणे, सभागृह नेता स्वप्निल शिंदे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, आशा कराळे, सोनाबाई शिंदे, उपायुक्त सुनील पवार आदींसह महापालिकेतील पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

सर्वेक्षणात काय आढळले?
प्रभाग ६ मध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात पुरेशी झाडे नाहीत. अंतर्गत रस्त्यांवर खड्डे आहेत. ओला-सुका कचरा विलगीकरण होत नाही. घंटा गाड्या वेळच्यावेळी येत नाहीत. रस्ते, अतिक्रमण व वाहतूक समस्या आहे. सार्वजनिक वाहनांच्या सुविधा नाहीत. पाणी पिण्यायोग्य असले तरी ते पुरेशा दाबाने येत नाही. सार्वजनिक उद्याने पुरेशी नाहीत, अशी विविध निरीक्षणे अहवालात नोंदविण्यात आली आहेत.

या सुचविल्या उपाययोजना
निरीक्षणानंतर जाणवलेल्या प्रमुख समस्या सोडवण्याच्यादृष्टीने नियोजन आराखडा करताना विद्यार्थ्यांनी नागरिकांशी चर्चा करुन उपाययोजना सुचविल्या आहेत. कोठे झाडांचे रोपण केले जावे, घंटा गाड्यांचे फेरीचे मार्ग कसे असावेत, कोठे बगीचे करण्याची गरज आहे, अंतर्गत रस्ते कोठे मजबूत केले पाहिजेत, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची कशी अंमलबजावणी केली जावी, प्रमुख रस्त्यांवर कोठे फूटपाथ केले जावेत, याबाबत त्यांनी उपाययोजना सुचविल्या आहेत.

यांनी केले सर्वेक्षण
सर्वेक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये साक्षी काळे, आशुतोष गायकवाड, निनाद देशपांडे, श्रवण बोजमवाड, जयश्री भिंगारदेवे, धनश्री बेडके, ऐश्वर्या न्यायाधीश, नयन शिंदे, मोनाली पल्लाळ, संकेत निंबाळकर, ऋचिता दहातोंडे, अनुष्का वाळके, प्राची सपकाळ व अंकिता देव आदींचा समावेश आहे.

आरोग्य विषयक वृत्त

कमी झोप घेऊन जास्त काम करणे शरीरासाठी घातक

डोळे लाल होण्याची ‘ही’ आहेत कारणे, दुर्लक्ष करू नका

त्वचेचा ‘ग्लो’ वाढवायचाय ? ‘या’ उपायांनी दिसेल ७ दिवसात परिणाम

लिव्हरसाठी ‘हे’ पदार्थ धोकादायक