कॉपी करू न दिल्याने ७ विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकाला फायटरने बेदम मारहाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील मारुतराव घुले महाविद्यालयात वार्षिक परीक्षा सुरु असताना कॉपी करु दिली नाही, या कारणावरुन परीक्षा विभागप्रमुख प्रा. महेश नामदेव शेजूळ यांना सात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मैदानावर फायटरने बेदम मारहाण केली.

याबाबत सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहिगावने येथील मारुतराव घुले महाविद्यालयात तृतीय वर्ष रसायनशास्त्र या विषयाच्या पेपरसाठी परीक्षा विभागप्रमुख म्हणून प्रा. शेजुळ काम पहात होते. परीक्षा सुरु असलेल्या ब्लॉक नंबर ८ मध्ये प्रा. संदीप नलवडे हे सुपरव्हीजन करत असलेल्या परीक्षा हॉलमध्ये एक विद्यार्थी मोबाइलच्या मदतीने कॉपी करत होता.

शिक्षकांनी याबाबत प्रा. शेजूळ यांना माहिती दिली. प्रा. शेजूळ हे प्रा. नलवडे यांच्यासमवेत परीक्षा हॉलमध्ये गेले, तेव्हा पहिल्या रांगेतील विद्यार्थी ओंकार राजेंद्र काकडे मोबाइलमधून कॉपी करत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी सदर विद्यार्थ्याला कॉपी करण्यास मज्जाव केला असता विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाला बेदम मारहाण केली.

Loading...
You might also like