पावसामुळे वेळेत पोहचू न शकलेल्या मुंबईत विद्यार्थ्यांची  पुन्हा नव्याने परीक्षा 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात आज पावसाने जोरदार हजेरी लावल्याने. मुंबई आणि जवळपासचा परिसर हा जलमय झाला आहे. मुंबईत झालेल्या अतिवृष्टीचा वाहतुकीवर परिणाम झाल्याने मुंबईकरांना आपल्या नियोजित स्थळी पोहोचणे  शक्य झाले नाही. तसेच अनेक विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेस बसले होते. पण काही विद्यार्थी  पावसामुळे परिक्षेसाठी योग्य वेळी पोहोचू शकले नाहीत, अश्या सर्व  विद्यार्थ्यांची पुन्हा नव्याने परीक्षा घेतली जाणार आहे.
[amazon_link asins=’B07B6SN496′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d18b1280-8398-11e8-8780-65093fb5f991′]

मुंबई विद्यापीठाच्या एमएस्सी सत्र २ आणि ४ च्या प्रात्यक्षिक परीक्षेस जे विद्यार्थी महाविद्यालयात पोहोचू शकले नाहीत, त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा विद्यापीठ पुन्हा घेणार आहे. तसेच एमए समाजशास्त्र सत्र 3ची आज दुपारी घेण्यात येणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव विनोद माळाळे यांनी सांगितले.

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांनाही पावसाची स्थिती पाहता आज सुट्टी देण्यात आली असुन याबाबत घोषणा केली. सर्वत्र  पाणी साचल्याने विद्यार्थी पावसात कुठेही अडकू नयेत  म्हणून  खबरदारीचा उपाय म्हणून शाळा-कॉलेजांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईत गेल्या काही  तासात १०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या २४ तासातही मुंबईसह आजबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज  कुलाबा हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांना  सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.