नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन पेटले, ३ बसेस जाळल्या, ६ मेट्रो स्टेशन बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात देशातील अनेक राज्यांत उग्र आंदोलने सुरू आहेत. आता देशाच्या राजधानीतही आंदोलनाने उग्ररूप धारण केले आहे. सध्या दिल्लीतील जामिया परिसरात उग्र आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी जुलेना येथे तीन बस जाळल्या. आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पाणी, अश्रू धुराचा वापर केला.

मेट्रो प्रशासनाने सांगितले की, सुखदेव विहार, जामिया मिलिया इस्लामिया, ओखला विहार, जसोला विहार आणि शाहीन बागच्या मार्गावरील आत आणि बाहेर जाण्याचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. आता या स्थानकावर ट्रेन थांबणार नाहीत. तसेच आश्रम मेट्रो स्थानक यापूर्वीच बंद करण्यात आले आहे.

आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पोलीस सुत्रांनी सांगितले की, आम्ही विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आहवान करत आहोत. जर त्यांना काही समस्या असेल तर त्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. कोणत्याही संशयिताला आश्रय देऊ नये. योग्य परवानगी घेऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यास त्यांना कोणीही आडवणार नाही.


दिल्ली पोलीसांच्या सल्ल्यानंतर सुखदेव विहार मेट्रो स्थानकाची दोन्ही प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहेत. यामुळे सुखदेव विहार स्थानकात ट्रेन थांबणार नाहीत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/