कोरडी रंगपंचमी खेळत विद्यार्थ्यांनी दिला पाणी वाचवण्याचा संदेश

 पक्षांच्या रक्षणासाठीही विद्यार्थ्यांनी केले एक मुठ धान्य गोळा

पुुुरंंदर : पोलिसनामा आँँनलाईन – कोरडी रंगपंचमी खेळत व एक एक मुठ धान्य जमा करित नीरा नजीक ॲसेंड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि.२५) रंगपंचमी उत्सहात साजरी केली. या स्कूलमध्ये गेल्या वर्षापासून कोरडी रंगपंचमी खेळण्याबाबत व जल प्रदुषण रोखण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती केेली जात आहे.

रंगपंचमी आली की विविध रंगांची आणि पाण्याची उधळण सुरू होते. यामध्ये बालकांपासून अगदी जेष्ठांपर्यंत प्रत्येक जण रंगपंचमीचा मनसोक्त आनंद घेत असतो. महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी रंगपंचमी म्हणजे आनंदाचा एक पर्वणीचा दिवसच असतो. अशात पाणी दुरभिक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन कोरडी होळी खेळताना मात्र फारसे कोण दिसत नाही.

नीरा (ता. पुरंदर) नजिक थोपटेवाडी येथील ॲसेंड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना त्याची जाणीव झाली आणि या वर्षीची रंगपंचमी कोरडी साजरी केली. त्या पाण्याचा उपयोग विद्यालयाच्या आवारातील झाडांसाठी केला. बऱ्याचदा रंगपंचमीला
पाण्यामध्ये विविध रासायनिक रंग मिसळले जातात. त्यामुळे पाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. तसेच लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जाते. मात्र स्वतःच्या आनंदासाठी पाणी रंग पंचमीत सर्रास वापरले जाते. याचा गांभीर्याने विचार करत या विद्यार्थ्यांनी कोरडी रंगपंचमी साजरी करत पाणी वाचवण्याचा तसेच प्रदूषण रोखण्याचा संदेश दिला.

संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ खोमणे म्हणाले की, आपले सणवार मुलांच्या मनात नकळत संस्कार करीत असतात. तसेेेच मुुले
घरी गेल्यानंतर रंग खेळणारच असतात. त्यामुळे आम्ही स्कूलमध्ये मुलांचे प्रबोधन करीत, त्यांना पाण्याचे महत्त्व सांगूण पाण्याविना रंगपंचमी खेळण्यासाठी प्रवृत्त केले. तसेच रंगामुळे पाण्याचे प्रदूषण कसे होते याची माहिती दिली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. तसेच सतत सर्व विद्यार्थ्यांनी यापुढे पाणी प्रदूषण करणार नाही असा निर्धार केला.

यावेळी संस्थेच्या सचिव नीता खोमणे, मुख्याध्यापक जॉन, सहशिक्षक साजिद शेख, स्वप्निल पवार, उपमुख्याध्यापिका सुषमा भुंजे, सोनाली काकडे, स्मिता गायकवाड, जास्मिन बागवान, सोमनाथ तांदळे, अमित मोरे, विठ्ठल झगडे, पालक प्रतिनिधी तानाजी थोपटे आदींसह पालक उपस्थित होते

 एकमुठ धान्य उपक्रमालाही चांगला प्रतिसाद

उन्हाळ्यामध्ये पशु पक्ष्यांना अन्न व पाणी कमी पडते. त्यामुळे अनेक पक्षांना मृत्यूला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांनी एक मूठ धान्य आपल्या घरून आणून ते शाळेमध्ये जमा केले. ते धान्य शाळेच्या परिसरातील पक्षांना देण्यात येणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी. पक्ष्यांचे रक्षण व्हावे ही भावना निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम सुरू केल्याचे संस्थेच्या सचिव नीता खोमणे यांनी सांगितले.

Loading...
You might also like