पिंपरी : पोर्टलवरील ऑनलाइन परिक्षा रद्द करण्याची मागणी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – महापोर्टल या वेबसाईडद्वारे घेण्यात येणारी परिक्षा रद्द करावी यासाठी मारुंजी येथील अलार्ड कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी मोठा गोंधळ घातला. तसेच ही परीक्षा रद्द करावी अशी मागणी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

राज्य शासनाच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीसाठी महापोर्टल या वेबसाईटद्वारे मारुंजी येथील अलार्ड कॉलेजमध्ये परिक्षा सेंटर आहे. येथे दोन शिफ्टमध्ये सोमवारी (दि. २) ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत होती. सकाळी पहिल्या बॅच मधील दोनशे विद्यार्थ्यांचा पेपर होता. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांना लॉगइन करण्यासाठी खूप वेळ लागत होता. दरम्यान पेपर सुरू असताना अनेक वेळा लाईट गेली, काही संगणक सुरू होत नव्हते. यामुळे वेळ वाया गेल्याचा आरोप करीत अखेर विद्यार्थ्यांनी परिक्षेवर बहिष्कार घातला.

Hinjewadi Police

विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाच्या विरोधात व महापोर्टलच्या विरोधात घोषणाबाजी केली. याबाबत माहिती मिळताच हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारे यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढत परीक्षेला पुढील तारीख देण्यासाठी महापोर्टल प्रशासनाशी बोलणी केल्याने प्रकरण निवळले.

Visit : policenama.com