JNU च्या दिक्षांत समारंभात ‘फी वाढी’सह इतर मागण्यांवर विद्यार्थी रस्त्यावर, पोलिसांनाच भिडले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाविद्यालयीन शुल्कावर आवाज उठवणारे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) विद्यार्थी आता रस्त्यावर आंदोलनासाठी उतरलेले आहेत. विद्यापीठाने पदवी वाटपाचा कार्यक्रम बाहेर आयोजित केल्याने देखील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर नाराज होते. याच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून मोर्चा देखील काढण्यात आला. यावेळी दिल्लीमध्ये कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आला.

पदवी वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी प्रमुख हजेरी लावलेली होती तसेच यावेळी मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक हे सुद्धा उपस्थित होते. यानंतर विद्यापीठातून कार्यक्रमाच्या ठिकाणा पर्यंत एक मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आईसा, एआयएसएफ आणि एसएफआय अशा प्रकारचे गटातील सर्व विद्यार्थी उपस्थित झालेले होते.

यावेळी विद्यार्थी कार्यक्रमाच्या ठिकाणी आंदोलन करण्यावर ठाम होते तसेच काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील गरीब विद्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी शुल्क कमी करण्याची देखील मागणी केलेली आहे.

शुल्क कमी करा पदवी वाटप कार्यक्रम नको
विद्यार्थ्यांच्या मते शिक्षण शुल्क वाढत असताना असले कार्यक्रम आम्हाला नकोत. आधीच विद्यापीठात हॉस्टेल खर्चावरून वातावरण तापलेले होते. त्यामुळे कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी शुल्क कमी करण्याची मागणी केली.

यावेळी विद्यापीठाच्या बाहेर होतोय पदवी वाटपाचा कार्यक्रम
यावेळी जागा कमी पडणार असल्याचे कारण देत विद्यापीठाने पदवी वाटपाचा समारंभ विद्यापीठाच्या बाहेरील वसंत कुंज मधील ऑल इंडिया काउंसिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) मध्ये आयोजित केला होता. यावेळी 460 विद्यार्थ्यांना पीएचडीचा पदवी जाणार होती.

जागेची होती कमतरता
विद्यापीठाच्या कोणत्याही हॉलमध्ये 300 पेक्षा अधिक सीट्स नाहीत त्यामुळे या समारंभाचे आयोजन विद्यापीठाबाहेर केले गेल्याचे डॉ एस सी गड़कोटी यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी मुलांचे पालक आणि शिक्षक देखील उपस्थतीत असतील त्यामुळे 800 सीट्सची क्षमता असलेल्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Visit : Policenama.com