‘विद्यार्थ्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर होऊ नये’, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची राज्यातील शाळांना नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांना नोटीस पाठवली आहे. विद्यार्थ्यांचा राजकीय वापर होऊ नये असं त्यांनी या नोटीशीत म्हटलं आहे. राजकीय विचार पसरवण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर केला जाऊ नये यासाठी वर्षा गायकवाड यांनी पाऊल टाकलं आहे आणि राज्यातील सर्व शाळांना नोटीस पाठवली आहे. शिक्षण विभागाकडून ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

माटुंगाच्या शाळेत विद्यार्थ्यांकडून जी भाषणं लिहून घेतली होती त्यासंदर्भात ही नोटीस देण्यात आली आहे. शाळेत झालेला कार्यक्रम कशा पद्धतीने झाला. यासाठी कोणती परवानगी होती याबाबत नोटीस माटुंगाच्या शाळेला गेली आहे. यानंतर राज्याच्या इतर शाळांनाही नोटीस पाठवण्यात आली की, शाळांचा वापर राजकीय कार्यक्रमासाठी होता कामा नये.

शाळांमधून फक्त शिक्षणच दिले गेले पाहिजे. म्हणून खबरदारी घेत राज्यातील सर्वच शाळांना याबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे की, शाळांचा वापर राजकीय कारणांसाठी होता कामा नये.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/