शाळेतील लिपीकाच्या छळाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

सिल्लोड (औरंगाबाद ) : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील उंडनगाव येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उंडनगाव येथील एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतील लिपीकाकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी रात्री घडला असून नातेवाईकांनी अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी शाळेतील क्लर्क संजय घुगरे ( रा. घटांब्री ) याला अटक केली आहे.
प्रणाली कृष्णा जाधव (वय -१७ ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती पालोद येथील महाविद्यालयात १२ वीचे शिक्षण घेत होती. संजय घूगरे हा सिल्लोड येथील रामकृष्ण विद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे.

संजय घूगरे याचे दररोज बसने येणेजाणे करतो. प्रणालीसुद्धा उंडनगाव येथून शिक्षणानिमित्त पालोद येथे बसने येणे जाणे करत होती. या दरम्यान, संजय तिची बसच्या प्रवासात रोज छेड काढत होता. मी म्हणेल तसे वाग नसता माझ्याकडे तुझे फोटो आणि व्हिडीओ आहे ते सोशल मीडियात व्हायरल करेल, तुझी आणि तुझ्या कुटुंबाची बदनामी करेल अशी धमकी देत होता. या रोजच्या त्रासाला प्रणाली कंटाळली होती. तिने याबाबत तिच्या पालकांना सांगितले असता त्यांनी संजयला समजावले होते. मात्र त्याने छेडछाड बंद केली नाही. यामुळे प्रणालीने आत्महत्या केल्याची तक्रार कृष्णा जाधव यांनी पोलिसात केली आहे.

सोमवारी प्रणालीचा पालोद येथील महाविद्यालयात निरोप समारंभ होता. यावेळी संजय घुगरे या कार्यक्रमात आला. त्याने प्रणालीला परत बदनामीची धमकी दिली. यानंतर घरी येताच सायंकाळी प्रणालीने आत्महत्या केली. पुढील तपास अजिंठा पोलीस करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like