धक्कादायक ! धावत्या रेल्वेसमोर उभे राहून विद्यार्थ्याची आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – मनमाड-नांदेड पॅसेंजरसमोर उभे राहून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या संग्रामनगर येथे गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली.

सुरज गंगाधर भंडारे (वय १९, रा. उमरी, सातारा परिसर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

सुरज हा संग्रामनगर येथे रेल्वे रुळावर पोल क्रमांक ११६/२ येथे अर्धा तास रेल्वे येण्याची वाट पाहात होता. तेथे एख ओटा आहे. तो काही वेळ या ओट्यावर बसून मोबाईलवर खेळत बसला होता. दरम्यान सोपान पंडीत हे शेजारच्या मैदानात फिरायला येतात. त्यानंतर ते याच ओट्यावर बसलेले असतात. दरम्यान तेथे अनोळखी तरुण बसल्याचे पाहून पंडीत दाम्पत्य तेथे गेले नाही. मात्र सुरजच्या हालचालींवरून त्यांना संशय आला. त्यावेळी सुरजला बसलेलं पाहून त्यांनी सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे यांना कळवले.

मात्र मनमाड पॅसेंजर तेथे भोंगा वाजवत आली. त्यावेळी सुरज अचानक गाडीसमोर उभा राहिला. दरम्यान पंडीत दाम्पत्य आणि गोर्डे यांनी त्याला पाहून मोठ्याने आवाज दिला. मात्र तोपर्यंत भरधाव वेगातील मनमाड नांदेड पॅसेंजर त्याच्या अंगावरून गेली. रेल्वेच्या लोकोपायलटने काही काळ गाडी थांबविली. परंतु काही उपयोग झाला नाही. त्यानंतर जवाहरनगर प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्रध्दा वायदंडे व त्यांच्या सहकाऱ्यानी धाव घेतली. सुरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like