विद्यार्थीनींना मिळणार शाळेमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकीन : योगेश मुळीक

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन

पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडील इयत्ता पाचवी ते बारावी या वर्गांतील विद्यार्थिनींना पहिल्या टप्प्यात विनामूल्य सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा करावा तसेच दुसर्‍या टप्प्यात सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात यावी. या महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले आणि  मनिषा लडकत यांचा महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून आलेल्या ठरावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.

यावेळी योगेश मुळीक म्हणाले की, प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील ११ ते १९ वयोगटांतील २५ हजार ८६४ विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन मोफत उपलब्ध होणार आहेत. दर महिन्याला प्रत्येक विद्यार्थ्यांनीस आठ नॅपकीन्स उपलब्ध करून दिली जाणार असून यासाठी ४९ लाख ६५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.