‘आरे’ वृक्षतोड प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील आरे वृक्षतोडप्रकरणी कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी थेट सरन्यायाधीशांना पत्र लिहले आहे. विद्यार्थ्यांनी लिहलेल्या पत्राची सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे. यावर सुप्रीम कोर्टात सोमवारी (दि.7) सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष उद्याच्या सुनावणीकडे लागले आहे.

कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना रविवारी सकाळी आरे वृक्षतोडप्रकरणी पत्र लिहले होते. यामध्ये सुप्रीम कोर्टाने मुंबईतील आरे प्रकरणाची दखल घेत यामध्ये हस्तक्षेप करावा. तसेच मुंबई महापालिका, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि मुंबई पोलिसांकडून सुरु असलेल्या आरेमधील वृक्षतोडीला स्थगिती देण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी विनंती कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.

वृक्षतोडीला होत असलेला विरोध पाहता आणि विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या पत्राची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी सुओमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर सोमवारी (दि.7) सकाळी दहा वाजता विशेष खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. राज्यामध्ये सध्या निवडणुकांचे वातावरण असताना आरे प्रकरणावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

Visit : Policenama.com