50% ‘कमिटेड’ महिला ठेवतात ‘बॅकअप’ पार्टनर, ‘रेडी’ असतो भविष्यातील रिलेशनशिपचा ‘प्लॅन’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात महिलांसंबंधी एका शोधातून अनोखी माहिती समोर आली आहे. यानुसार महिलांच्या डोक्यात वर्तमानातील नाते आणि लग्नानंतरच्या नात्यामध्ये दुसऱ्या जोडीदाराचा विचार सुरु असतो. या शोधामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या डोक्यात ब्रेकअप नंतरचा देखील प्लॅन सुरु असतो. यामध्ये याला प्लॅन बी असे नाव देण्यात आले असून विदेशातील महिलांचा यामध्ये अभ्यास करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अभ्यासात 1 हजार महिलांचा सर्व्हे करण्यात आला असून यामधील 50 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांनी दुसऱ्या व्यक्तीविषयी विचार केला आहे. ब्रेकअप झाल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीशी नाते जोडण्याचा त्यांनी या नात्यातच विचार केला असल्याची माहिती यामधून समोर येत आहे. त्याचबरोबर लिव्हइन मध्ये राहणाऱ्या महिलांच्या तुलनेत विवाहित महिलांच्या डोक्यात हा विचार मोठ्या प्रमाणात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

मित्र असतात दुसरे पार्टनर –
दुसरा पार्टनर कोण असू शकतो याचा शोध घेतला असता तो अनेक प्रकरणांत खास मित्रच असतो. जो या महिलेला सन्मान देऊ शकतो आणि तिच्या भावना समजू शकतो. त्याचबरोबर जुना बॉयफ्रेंडदेखील असू शकतो. त्याचबरोबर एकत्र काम करणारा व्यक्ती देखील या महिलांचा दुसरा जोडीदार असू शकतो. त्याचबरोबर एका महिलेने तर सांगितले कि, तिने आपल्या प्लॅन बी विषयी देखील आपल्या पार्टनरला सांगितले आहे. त्याचबरोबर 10 महिलांमधील चार महिलांनी तर नात्यात असतानाच दुसऱ्या पुरुषाबरोबर असलेल्या संबंधांविषयी विचार व्यक्त केले आहेत.

Visit : Policenama.com

You might also like