‘कोरोना’मुळं पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो परिणाम, स्पर्म क्वालिटी देखील खराब होण्याची शक्यता – संशोधनातील दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, कोरोना व्हायरसबाबत मोठी बातमी समोर आली आह. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या पुरुषांची प्रजनन क्षमता कमी होऊ शकते.

कोरोना व्हायरसवर केले गेलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. यामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या पुरुषांच्या स्पर्म क्वालिटीवर परिणाम होऊ शकतो आणि प्रजनन क्षमता कमी होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. असे असले तरीही दुसऱ्या काही तज्ज्ञांनी यावर अधिक सर्वेक्षण होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

प्रजनन क्षमतेवर प्रभाव होत असल्याचे अस्पष्ट

कोरोना व्हायरस संसर्ग झालेल्या रुग्णाच्या फुफ्फुस, आतडे आणि ह्रदयावर एटॅक करतो. तसेच हा व्हायरस पुरुषांच्या प्रजनन अवयवांवरही परिणाम करतो. शुक्राणूंच्या निर्मितीसाठी बाधित करु शकतो. याशिवाय प्रजनन हार्मोनलाही बाधित करू शकतो. पण पुरुषांच्या प्रजनन करणाऱ्या क्षमतेवर व्हायरस प्रभावी होत असल्याचे अद्याप स्पष्ट झाले नाही.

कोरोनाबाधित 84 रुग्णांवर करण्यात आला अभ्यास

कोरोनाबाधित 84 पुरुषांमध्ये 60 दिवसांपर्यंत 10 दिवसांच्या कालावधीत विश्लेषणाची तुलना 105 सुदृढ पुरुषांच्या डाटासोबत केली. यामध्ये स्पर्म सेल्समध्ये सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसची वाढ झाल्याचे दिसले.