‘कोरोना’ रुग्णांची वास ओळखण्याची क्षमता का होते नष्ट ? वैज्ञानिकांनी शोधले कारण, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. आत्तापर्यंत या विषाणूमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. खरंतर कोरोना आणि साधारण फ्लू यातील फरक ओळखणे अवघड आहे. कोरोना विषाणूची लक्षणं देखील साधारण फ्लू सारखीच ताप, सर्दी, कोरडा खोकला अशी आहेत. पण जगात असंही दिसून आलं आहे की कोरोना संक्रमित व्यक्तीची वास ओळखण्याची क्षमता (sense of smell) नाहीशी होते. असं का होत आहे? यावर जगातील अनेक वैज्ञानिक रिसर्च करत आहेत. दरम्यान अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या काही वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर मिळवलं आहे.

रिसर्च मध्ये काय समोर आलं?
वैज्ञानिकांनी सांगितले की, नाकाचा जो भाग वास ओळखण्याचे काम करतो त्या ठिकाणी एंजिओटेेनंसीनचे प्रमाण खूप जास्त वाढते. यालाच कोरोनाचा एंट्री पॉईंट समजलं जातं. इथून कोरोना विषाणू शरीरात प्रवेश करून संक्रमण वाढवतो. वैज्ञानिकांच्या मते एंजिओटेेनंसीनचे प्रमाण या ठिकाणी इतर ठिकाणच्या प्रमाणापेक्षा 200 ते 700 टक्के अधिक वाढते.

असा केला गेला रिसर्च
रिसर्च करणाऱ्या वैज्ञानिकांनी 23 रुग्णांच्या नाकाच्या मागच्या भागातील सॅम्पल घेतलं होतं. हे सर्व रुग्ण कोरोना संक्रमित नव्हते. त्यानंतर काही कोरोना संक्रमित रुग्णांच्या नाकातील सॅम्पल घेतले गेले. तुलनात्मक परिक्षणांनंतर समजले की कोरोना संक्रमित रुग्णांच्या नाकातील एंजिओटेेनंसीनचे प्रमाण इतर रुग्णांच्या तुलनेत 200 ते 700 टक्के अधिक होते.

रिसर्चचे फायदे
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, आत्तापर्यंतच्या रिसर्च वरून असे दिसून आले की नाकाच्या याच भागातून कोरोना विषाणू शरीरात प्रवेश करतो. जर असं असेल तर अँटीव्हायरस थेरेपीच्या मदतीने संक्रमण थांबवता येऊ शकते.