अभ्यासिका ही गेंम चेंजर ठरावी : खा. वंदना चव्हाण

कोंढव्यातील विकास कामांचे भूमिपूजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अभ्यासिकेचा उपयोग करुन आपल्या युवक, युवती स्पर्धा परिक्षांमध्ये उतरु शकतील त्यातून त्यांच्या आयुष्याला एक नवे वळण मिळू शकते अभ्यासिका ही अनेकांच्या जीवनात तसेच समाजाच्या जीवनात गेंम चेंजर ठरु शकते, असे प्रतिपादन खासदार वंदना चव्हाण यांनी केले.
कोंढवा खुर्द – मिठानगरमधील महापालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. हाजी गफूर पठाण यांच्या विकास निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

खासदार वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीतून उभारण्यात येणाऱ्या हजरत मौलाना कलंदर साहेब (रहै) अभ्यासिका व वाचनालयाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. तसेच हजरत टिपू सुलतान (रहै) क्रीडांगणात विविध विकास कामे करणे, माता रमाबाई आंबेडकर महिला प्रशिक्षण व उद्योग केंद्र आणि ओटा मार्केटचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, क्षेत्रीय कार्यालय अध्यक्ष रत्नप्रभा जगताप, विधानसभा अध्यक्ष नारायण लोणकर, नगरसेविका नंदा लोणकर, नगरसेविका परवीन फिरोज शेख, हसीना इनामदार, रईस सुंडके, अनिस सुंडके, शालिनी पाटील, मनाली भिलारे, आस्मा शेख, मौलाना अब्दुल समद, मौलाना समद, मौलाना मन्सूर, मौलाना सलीम, मौलाना फरीद पठाण, बापू मुलाणी, नूर शेख, इम्तियाज शेख, मेहबूबू शेख, सरवर शेख, कदीर शेख, अब्दुल बागवान, आसिफ पटेल, हुसेन पाशापुरी, शकुर शेख, सिकंदर पठाण, हनीफ शेख, आबिद शेख, यामिन अन्सारी, जाहिद शेख, फय्याज मोमीन, इम्मा भाई, राजू शेख, रऊफ शेख, मोहसीन शेख,अख्तर पिरजादे, देशपांडे, ज्योती पाटील, समीर शेख,आरिफ शेख, कत्तल शेख, इम्तियाझ शेख,शाहरुख बागवान व स्थानिक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

अ‍ॅड चव्हाण म्हणाल्या, नगरसेवक अ‍ॅड अब्दुल गफूर पठाण यांना महापालिकेतून विकास कामांसाठी निधी कसा मंजूर करुन आणायचा याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षापेक्षा अधिक निधी त्यांनी मंजूर करुन आणला आहे. काही कमी पडले तर आम्ही खासदार निधीतून त्यांच्या कामांना मदत करायला कधीही तयार आहोत. गफूर पठाण यांनी सुरुवातीला सर्वांचे स्वागत करुन कोंढवा भागात होत असलेल्या विकास कामांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हाफिज जलिस यांनी व आभार रईस सुंडके यांनी मानले.

You might also like