‘मदत’ मागण्याचा ’हा’ आहे ‘फायदा’, जाणून घ्या ‘रिसर्च’मधील 4 निष्कर्ष, वाटणार नाही ‘कमीपणा’

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  दुसर्‍याकडे मदत मागताना अनेकजण खुप विचार करतात. काहींना तो कमीपणा वाटतो, तर काहींसाठी इगो हर्ट होण्याचा प्रकार असतो. यामागचे कारण असेही आहे की, मदत करणारे सुद्धा फार कमी लोक असतात, काही वेळा तुम्हाला नकार ऐकावा लागू शकतो, हा नकार जास्त त्रासदायक वाटत असतो. मदत करणे किंवा न करणे हे मानवी स्वभावावर अवलंबून असते. काही लोक असे असतात की, तुम्ही न मागताही तुमची गरज ओळखून मदत करतात. पण, नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून असा निष्कर्ष समोर आला आहे की, मदत मागितल्याने तुमची पर्सनॅलिटी अधिक चांगली होते. युनिव्हर्सिटी ऑफ एरिझोनाच्या अभ्यासकांनी केलेला हा रिसर्च जर्नल ऑफ रिसर्च इन पर्सनॅलिटीमध्ये प्रकाशित झाला आहे. या रिसर्चमध्ये काय सांगितले आहे ते आपण जाणून घेवूयात.

हे आहेत रिसर्चमधील निष्कर्ष
1 रिसर्चमधून असे समोर आले आहे की, परिवार किंवा सहकार्‍यांकडून मदत घेतल्याने तुमचे व्यक्तिमत्व सुधारते.

2 जे लोक ध्येयाबाबत आठवण करून देतात आणि ते मिळवण्यासाठी तुमची मदत करतात ते तुमचे व्यक्तिमत्व अधिक चांगले करण्याचे काम करतात.

3 व्यक्तित्वात आयुष्यभर बदल होत राहतात. जीवनात घडणार्‍या विविध प्रमुख घटनांमुळे लोकांच्या व्यक्तिमत्वात बदल येतो.

4 लोक कॉलेजमध्ये जास्त कर्तव्यनिष्ठ आणि अनेक गोष्टींवर सहमत असतात. लग्नानंतर ते बहिर्मुख तर निवृत्तीच्या वयात पुन्हा सहमतीचा व्यवहार धारण करतात, असे या रिसर्चमध्ये आढळले आहे.