मुलांना कोणतं ‘दूध’ द्यावं, जाणून घ्या ‘रिसर्च’मधील ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी, लठ्ठपणाचा ‘धोका’ होईल कमी

पोलीसनामा ऑनलाइन – लहान मुलांना कोणतं दूध द्यावं? फॅटयुक्त की फॅट नसलेले की आणखी कोणतं, असा प्रश्न पालकांना नेहमीच पडलेला असतो. कारण दूध हे लहान मुलांसाठी अतिशय आवश्यक आहे. यास पूर्णान्न म्हटले जाते. चुकीचे दुध सेवन केल्यास मुलांमध्ये लठ्ठपणासारख्या समस्या वाढतात. यासाठी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती आपण घेणार आहोत. कॅनडातील सेंट मायकल्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केलेल्या संशोधनात कोणते निष्कर्ष समोर आले आहेत, ते जाणून घेवूयात.

संशोधनातील निष्कर्ष

1 लहान मुले रोज फूल क्रीम दुधाचं सेवन करतात त्यांना लठ्ठपणाचा धोका त्या मुलांच्या तुलनेत 40 टक्के कमी असतो, जे लो-फॅट दुधाचं सेवन करतात.

2 लहान मुलांचा दुधाचा आहार आणि त्यातून त्यांना होणारी लठ्ठपणाची समस्या यातील संबंधावर हा अभ्यास करण्यात आला.

3 लो-फॅट दूध सेवन करणार्‍या लहान मुलांना लठ्ठपणाचा धोका कमी होतो, असे समजले जात होते. परंतु या संशोधनात आढळले की, फूल क्रीम दूध सेवन करणार्‍या लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका कमी राहतो.

4 या नव्या रिसर्चमधून लेटेस्ट इंटरनॅशनल गाइडलाइन्सला आव्हान दिल्याचे दिसते. या गाइडलाईन्समध्ये लठ्ठपणाचा धोका कमी करण्यासाठी दोन वय असल्यापासून लहान मुलांना फूल क्रीमऐवजी लो-फॅट दूध देण्याचा सल्ला दिला जातो.

5 कॅनडा आणि अमेरिकेत जास्तीतजास्त मुले रोज गायीचं दूध सेवन करतात. यातून अनेकांना डायट्रीफॅट मिळतं. संशोधनात ज्या मुलांना नव्या गाइडलाईन्सचं पालन करत दोन वर्षाचे असतानापासून लो-फॅट दूध देण्यात आलं होतं, ती मुले फूल क्रीम दूध सेवन करणार्‍यांपेक्षा बारीक नव्हती.

6 आतापर्यंत जेवढे रिसर्च झाले ते ऑब्जर्वेशनवर आधारित होते. याचा अर्थ हा होतो की, आपण हे निश्चितपणे म्हणू शकत नाही की, फूल क्रीम दुधामुळे लठ्ठपणाचा धोका कमी झाला किंवा नाही.