‘या’ लोकांना स्कीन कॅन्सरचा सर्वाधिक धोका ! रिसर्चमधून आश्चर्यकारक खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  एका रिसर्चमधून स्किन कॅन्सरबद्दल धक्कादायक खुलासा झाला आहे. रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, गे आणि बायसेक्शुअल लोकांमध्ये स्किन कॅन्सरचा धोका सर्वात जास्त असतो. जामा स्कीन सायन्स जर्नलमध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. बोस्टनमधील ब्रिघम आणि महिला हॉस्पिटलनं मिळून हा रिसर्च केला आहे.

अभ्यासकांनी मोबाईल फोनच्या माध्यमातून डेटा एकत्र केला. रिसर्चसाठी अभ्यासकांनी 2014 पासून दरवर्षी 4 लाख 5 हजार फोन इंटरव्ह्यु केले. यावर आधारीत डेटा एकत्र करून त्यांनी निष्कर्ष काढले आहेत.

अभ्यासकांच्या मते बायसेक्शुअल पुरुषांमध्ये स्कीन कॅन्सरचा धोाक 8.4 टक्के असतो तर गे पुरुषांना हा धोका 8.1 टक्के असतो. हेट्रोसेक्शुअल पुरुषांमध्ये स्कीन कॅन्सरचा धोका गे लोकांच्या तुलनेत 6.7 टक्के आणि हेट्रोसेक्शुअल महिलांमध्ये लेस्बियनच्या तुलनेत 6.6 टक्के जास्त राहतो.

गे आणि बायसेक्शुअल महिलांमध्ये हा धोका 5.9 टक्के आणि 4.7 टक्के राहतो. सामान्य लोकांच्या तुलनेत गे आणि बायसेक्शुअल पुरुष आणि महिलांना स्किन कॅन्सरचा धोका अधिक असल्याचं रिसर्चमधून समोर आलं आहे.

जेव्हा त्वचेच्या कोशिका असामान्य रूपाने विकसित होत असतील तेव्हा स्कीन कॅन्सरचा धोका जास्त असू शकतो. शरीरातील ज्या भागावर सुर्याची किरणं थेट पडतात त्या भागावरही स्किन कॅन्सरचा धोका अधिक असतो. यात स्किनमध्ये बदल पाहायला मिळतो. उन्हात गेल्यावर अंगाला खात येते. ही स्किन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like