कोलेस्ट्रॉल कमी झाल्यास वाढतो हॅमरेजिक स्ट्रोकचा धोका ! जाणून घ्या कसं करावं कंट्रोल

पोलिसनामा ऑनलाइन – कोलेस्ट्रॉल हा कोलेस्ट्रॉल व्हॅक्स किंवा मेणासारखा एक पदार्थ असतो साधारण वयाच्या विशीनंतर शरीरातील याचा स्तर वाढत जातो. परंतु याचं प्रमाण वाढलेलंही चांगलं नाही आणि कमी झालेलंही चांगलं नाही. याच स्तर कंट्रोलमध्ये असावा लागतो. नाही तर अनेक समस्या येतात. जर याचा स्तर वाढला तर, आर्टरी ब्लॉकेज, हार्ट अटॅक हृदयरोग अशा अनेक समस्या येतात. जेव्हा याचा स्तर वाढतो तेव्हा शरीराचे संकेत ओळखून वेळीच ब्लड टेस्ट करायला हवी जेणेकरून यापासून तुम्हाला सुटका करता येईल.

काय होईल समस्या ?

कोलेस्ट्रॉलचा तसा तर थेट संबंध हा हृदयासोबत असतो. परंतु एका नव्या रिसर्चमध्ये असं समोर आलं आहे की, जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकच कमी झालं तर यामुळं ब्रेन हॅमरेजिक स्ट्रोक म्हणजेच मेंदूत रक्तस्त्रावाचा आघात होण्याचा धोका वाढतो.

एका रिसर्चनुसार, कोलेस्ट्रॉल फारच कमी झालं तर हॅमरेजिक स्ट्रोकचा धोका 169 टक्के अधिक होतो. भारत आणि अमेरिकेत हृदयरोगांच्या रुग्णांची संख्या खूप आहे. अनेक लोकांना वेगवेगळ्या हृदगयरोगांमुळं जीव गमवावा लागतो.

96 हजार लोकांवर रिसर्च

96043 लोकांचा या रिसर्चमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यांना कधीही हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा कॅन्सर असे आजार झालेले नव्हते. रिसर्च सुरू करण्याआधी त्यांचं एलडीएल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण मोजण्यात आलं. नंतर सलग 9 वर्षे त्यांचं कोलेस्ट्रॉल मोजण्यात आलं. या रिसर्चमधून जो काही निकाल समोर आला त्यानं हृदयरोग आणि हॅमरेजच्या केसेससोबत निपटण्यास खूप मदत झाली.

कोलेस्ट्रॉल कसं करावं कंट्रोल ?

– जंक फूड खाणं टाळावं. कारण यामुळं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं.
– भाजी बनवताना तेलाचं प्रमाण कमी असावं.
– भाज्या उकडून खाल्ल्या तर त्याचा जास्त फायदा होतो.
– चहा, कॉफी, मिल्क शेक यांचं सेवन करा. परंतु यासाठी लो फॅट असलेलं दूध वापरा. क्रीम आणि प्रक्रिया केलेली डेअरी उत्पादनं टाळा.
– नियमित व्यायाम करा.