मच्छरांमुळे पसरू शकतो का ‘कोरोना’ व्हायरस ? रिसर्चमध्ये समोर आली ‘ही’ बाब, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसचा एका माणसाकडून दुसर्‍या माणसाकडे प्रसार होण्याशिवाय आणखी कोण कोणत्या प्रकारे याचा प्रसार होऊ शकतो बाबत अनेक रिसर्च आणि स्टडी होत आहेत. याबाबत अमेरिकेच्या कन्सास स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये एक स्टडी झाला आहे. या अभ्यासातील एक निष्कर्ष खुपच दिलासादायक आहे.

युनिव्हर्सिटीच्या एका टीमने रिसर्च केला की, मच्छर कोरोना व्हायरसचे संचरण करण्यास सक्षम आहे का ? ते यास माणसापर्यंत पोहचवू शकतात का ? परंतु, अभ्यासात या प्रश्नांची उत्तरे नाही, अशी आली आहेत.

संशोधकांनी स्पष्ट केले की, कोविड -19 व्हायरस मच्छरांद्वारे लोकांपर्यंत पोहचू शकत नाही. सार्स-सीओव्ही-2 च्या मच्छरांद्वारे ट्रांसमिट करण्याच्या क्षमतेवर करण्यात आलेले हे पहिले प्रयोगिक परिक्षण होते.

अमेरिकेत कंन्सास स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधक स्टीफन हिग्स यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, निश्चितपणे मच्छर व्हायरसला प्रसारित करत नाही. परंतु, या सिद्धांताचे समर्थन करण्यासाठी निर्णायक डेटा देणारे पहिले संशोधन आमचे आहे.

महत्वाची बाब हीदेखील आहे की, हे परीक्षण मच्छरांच्या तीन अशा प्रजातींवर केले, ज्या व्यापक प्रमाणात आढळतात. या प्रजाती एडीज एजिप्टी, एडीस अल्बोपिक्टस आणि क्यूलेक्स क्विनकॅफॅसिअसस प्रजाती आहेत. या तीनही प्रजाती कोरोना व्हायरस निर्माण करणार्‍या चीनमध्ये आहेत. स्पष्ट आहे की, संशोधनात याबाबत दिलासा मिळाला आहे की, या तीन प्रजाती तरी धोकादायक नाहीत. अभ्यासात आढळले की, मच्छरांच्या या तीन जाती व्हायरसला रेप्लिकेट करण्यात असमर्थ आहेत आणि यामुळे मनुष्यात ते कोरोना संसर्ग पसरवू शकत नाहीत.