मौनी रॉयचा हा ‘मोहक’ अंदाज पाहिलात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मौनी रॉय सध्या सोशल साइट वर आपले सुंदर फोटोज टाकतांना दिसते आहे. या दिवसांमध्ये मौनीचे फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. टीव्ही शोमधून बॉलीवूड चित्रपटांमध्ये पदार्पण करणाऱ्या मौनी रॉयने चित्रपटसृष्टीमध्ये आपली विशेष अशी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयामुळे ती सगळ्यांची आवडती झाली आहेच पण तिच्या फॅशनसेन्स मुळे ती सगळ्यांच्या चर्चेत आली आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीमधील दोन चित्रपट गाजवणारी मौनी ट्रेडिशनल लुकमध्ये पोज देतांना दिसते आहे.

Mouni-Roy

नुकतेच मौनीने सोशल मीडियावर काही फोटोज शेयर केले आहेत त्या मध्ये तिने सुंदरसा शरारा घातलेला दिसताे आहे. गर्मी मध्ये सिंपल साडी मध्ये देखील स्टयलिश दिसायचे असेल तर मौनीच्या स्टाईलला कॉपी करा. क्रीम कलरच्या सूट मध्ये मौनी खूप सुंदर दिसते आहे आणि तिने त्यावर ओढणी कॅरी केली आहे. हा लुक आणखी सुंदर दिसण्यासाठी तिने त्या सूटवर मॅचिंग इअरिंगस कानात घातले आहेत आणि पिंक न्यूड लिपिस्टिक सोबत तिने विंग्ड लाइनर मेकअप केला आहे.

Mouni

मौनीच्या केसांबद्दल बोलायचे गेले तर तिने केसांना हलकासा सॉफ्ट कलर केला आहे. मौनींकडे एकापेक्षा एक डिजाइनर सूट आहेत. ज्या मध्ये ती खूप स्टायलिश दिसून येते. आत्तापर्यन्त दोन हिट चित्रपट गाजवणारी मौनी तिच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. ती लवकरच रणबीर आणि आलिया सोबत ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटामध्ये दिसून येणार आहे.